The Bharatiya
February 23, 2015
NatGeo Photography theme Mumbai
'नॅशनल जिओग्राफिक चॅनल'ने फोटोग्राफीवर आधारित रिअॅलिटी शो सुरू केलाय आणि त्यासाठीची थीम आहे मुंबई. या अविरत पळणाऱ्या शहराला कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी देशभरातून पॅशनेट फोटोग्राफर सरसावले आहेत. त्यातल्या यंग ब्रिगेडशी साधलेला संवाद आणि त्यांच्या दृष्टिकोनातून उलगडलेली मुंबई..
'फोटोग्राफी ही अशी भाषा आहे जी संपूर्ण जगात समजली जाते', असं प्रसिद्ध फोटोग्राफर ब्रुनो बार्बी याने म्हटले आहे. एखादा फोटो शब्दांशिवाय बरच काही दाखवून आणि सांगून जातो. एकदा निघून गेलेली वेळ, निसटलेला क्षण आणि अनुभवलेले सोहळे परत अनुभवता येत नाहीत असे म्हणतात, पण कॅमेऱ्याच्या रूपाने ते क्षण टिपण्याची आणि आठवणीत ठेवण्याची किमया साधली जाऊ शकते. आजची तरुणाई फोटोग्राफीकडे आवर्जून वळताना दिसते. फोटोग्राफीमध्ये डिजिटल युग अवतरल्यानंतर फोटोग्राफीची कला नव्याने बहरत आहे.
याच कलेच्या शोधात आणि कलाकारांच्या दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी देशभरातील १६ फोटोग्राफर्सना घेऊन 'नॅशनल जिओग्राफिक चॅनल'ने 'कव्हरशॉट सिझन ३' हा फोटोग्राफीवर आधारित रिअॅलिटी शो सुरू केला आहे. या शो च्या माध्यमातून हौशी फोटोग्राफर्सनी 'मॅक्झिमम सिटी' या थीमवर काम करायचे ठरवलेय. मॅक्झिमम सिटी अर्थात मुंबईच्या बाह्य़रूपासोबत तिचे अंतरंग क्लिक करण्याचा प्रयत्न या फोटोग्राफर्सनी केला आहे. या स्पध्रेत भारतातील विविध भागातून आलेले नवोदित फोटोग्राफर्स त्यांचं टॅलेंट सादर करणार आहेत. या १६ फोटोग्राफर्समध्ये यंग ब्रिगेड मोठी आहे. त्यातल्याच काहीजणांशी 'लोकसत्ता व्हिवा'ने संवाद साधला.
या स्पध्रेतील १९ वर्षांचा सुमेध सावंत हा यंगेस्ट फोटोग्राफर आहे. सुमेध मुंबईकर. अभ्यासाची तितकीशी गोडी नसल्याने आणि क्रिएटिव्ह फिल्डमध्ये काहीतरी करण्याच्या इच्छेमुळे फोटोग्राफीकडे वळला आणि आता फोटोजर्नालिझमचा विद्यार्थी आहे. 'मी मूळचा मुंबईकर असल्याने मुंबईचं वेगळं रूप दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय. संपूर्ण मुंबई फिरलो असल्याने त्याचा मला फायदा झाला. मात्र या स्पध्रेत इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्या गोष्टी मला नेहमीच्या होत्या. त्यातला नवा अँगल शोधणं हे कसब होतं', सुमेध म्हणाला. 'एका वेगळ्या दृष्टिकोनातून मुंबई पहिली आणि लेन्सच्या साहाय्याने दाखवली. हा अनुभव खूप चांगला होता आणि प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं होतं आणि सर्वात लहान असल्याने गमावण्यासारखं काहीच नव्हत', तो म्हणतो.
चेन्नईची सौम्या मुंबईच्या लोकलच्या प्रेमात आहे. सौम्याचे वडील कमíशयल फोटोग्राफर आहेत आणि ती सुद्धा फोटोग्राफीकडे प्रोफेशनल म्हणून पाहते. तिला स्ट्रीट फोटोग्राफी आणि डॉक्युमेंटरी स्टाईल फोटोग्राफीची आवड आहे. 'स्पध्रेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत येण्याची संधी मिळाली, त्यामुळे एक्साईटेड आहे. हा खूप वेगळाच अनुभव होता', असे ती सांगते. 'मुंबईच्या लोकल ट्रेन्स कॅमेऱ्यात टिपताना खूप मज्जा आली. विविध भागातून आलेली लोकं एकत्रितरीत्या प्रवास करताना दिसतात. मुंबईचा गजबजाट शांततेच्या वातावरणातून आलेल्या माझ्यासारख्या मुलीला आकर्षति करतो आणि तो मी उत्साहाने अनुभवला आणि कॅमेऱ्यात टिपला', असे ती सांगते.
इंजिनिअरिंगचं क्षेत्र सोडून फोटोग्राफीकडे वळलेला शरद वेगडा फोटोग्राफीबद्दल खूपच पॅशनेट आहे. 'माझ्या अठराव्या वाढदिवसाला कॅमेरा गिफ्ट म्हणून मिळाला आणि त्यातून काढलेल्या फोटोंना मोठी दाद मिळाली. पुढे याच पॅशनमुळे इंजिनिअिरग सोडून मी फोटोग्राफीकडे वळलो', शरद सांगतो. त्याचे वडील पौरोहित्य करतात. १२ वर्षे गुजरातमध्ये राहिल्यानंतर आता तो मुंबईत स्थायिक झालाय. स्ट्रीट फोटोग्राफीची त्याला आवड आहे . 'मुंबई मला माझ्या घरासारखी वाटते आणि मुंबईचे अनेक पलू आहेत त्यामुळे इथे फोटोग्राफी करायला आवडते. फोटोग्राफी करायची असेल तर घरातून बाहेर पडायला हवं. कोणताही फोटो सहज मिळत नसतो त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं असतं', असं त्याने सांगितलं.
आता तरुणाई फोटोग्राफीकडे केवळ छंद म्हणून नाही तर करीअर म्हणून पाहतेय. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी धडपडताना, त्यासाठी लागणारे कष्ट तर घेते. एका वेगळ्या क्लिकच्या शोधात असताना त्यातून नवनिर्माणाची वाट धुंडाळतानासुद्धा दिसतेय. अशा रिअॅलिटी शोमधून अशाच पॅशनेट फोटोग्राफर्सची ओळख होतेय.